अप्लाईड आर्ट परीक्षेत बी.एस. बांदेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची चमक

सावंतवाडी
मुंबई विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या बीएफए (अप्लाईड आर्ट) शाखेचा निकाल जाहीर झाला असून यात सावंतवाडीच्या बी.एस.बांदेकर फाईन आर्टसच्या तीन विद्यार्थ्यांनी अकरा गुणवंतांच्या यादीमध्ये स्थान पटकावले आहे. यात प्रियांशू मांजरेकर, उन्मेश पाटकर आणि महादेव सावंत या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या यशाबद्दल संस्थेच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. यावर्षी अंतिम परीक्षेसाठी तब्बल २७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ८ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली तर १८ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य उदय वेले, प्रा. सिद्धेश नेरुरकर, प्रा. राधा गावडे, प्रा. तुकाराम मोरजकर, प्रा. चेतन यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश भाट, संस्थापक सदस्य, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.