तारामुंबरी किनारी पाच फूट लांबीचा डॉल्फिन मृतावस्थेत

तारामुंबरी किनारी पाच फूट लांबीचा डॉल्फिन मृतावस्थेत

 

देवगड

 

   तारामुंबरी समुद्रकिनारी सोमवारी दुपारी एक डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळून आला. हा प्रकार सागर सुरक्षा रक्षकाच्या गस्तीदरम्यान निदर्शनास आला.देवगड येथील सागर सुरक्षा रक्षक  हे सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तारामुंबरी समुद्रकिनारी गस्त घालत असताना त्यांना हा डॉल्फिन मृतावस्थेत आढळला. त्यांनी तात्काळ याबाबत मत्स्यव्यवसाय परवाना अधिकाऱ्यांना कल्पना दिली.माहिती मिळताच मत्स्यव्यवसाय विभागामार्फत वनविभागाला याबाबत कळविण्यात आले आहे. मृतावस्थेत आढळलेला डॉल्फिन सुमारे पाच फूट लांबीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.