वेंगुर्ल्यात दिव्यांगांसाठी UDID कार्ड व पडताळणी शिबिर
वेंगुर्ले
तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID (Unique Disability ID Card) काढून घेणे आणि विद्यमान लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते सायं. ६ या वेळेत उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ले येथे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे मासिक अनुदान रु.१५०० वरून वाढवून रु.२५०० करण्यात आले आहे.
वेंगुर्ला तालुक्यात सध्या ५५७ लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असून त्यापैकी ३५२ जणांकडे UDID कार्ड आहे, तर २०५ लाभार्थ्यांकडे कार्ड नाही. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सर्व दिव्यांगांसाठी UDID कार्ड बंधनकारक आहे. शिबिरासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड
रेशनकार्ड
पासपोर्ट साईज फोटो
नोंदणीची पद्धत
UDID कार्ड नसलेल्या लाभार्थ्यांनी www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर फॉर्म भरावा.ही सुविधा महा ई-सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे.
"शिबिरात उपस्थित राहून आपल्या UDID कार्डची नोंदणी किंवा पडताळणी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा."वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी यांनी सर्व दिव्यांगांना आवाहन केले आहे

konkansamwad 
