परुळे-निवती पोलिसांची सामाजिक बांधिलकी.......'पाणी अडवा, पाणी जिरवा' मोहिमेअंतर्गत चिपीमध्ये वनराई बंधारे
चिपी
परुळे-निवती पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत 'पाणी अडवा, पाणी जिरवा' मोहिमेला सुरुवात केली असून ग्रामस्थांच्या सहकार्यातून वनराई बंधारे बांधण्यात पुढाकार घेतला आहे.चिपी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चिपी वाडी ओवळे बांधावर पहिला बंधारा बांधण्यात आला. यावेळी निवती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी, अंमलदार कुंभार, होमगार्ड गोसावी, केळुसकर, राऊळ, खोत, फणसेकर उपस्थित होते.यासोबतच चिपी ग्रामपंचायत सरपंच माया माड्ये, उपसरपंच प्रकाश चव्हाण, सदस्य सौ. सावंत, पोलीस पाटील संदेश पवार, ग्रामविकास अधिकारी पिंगुळकर, माजी सरपंच दीपक चव्हाण, साक्षी चव्हाण, जयप्रकाश चव्हाण, शशिकांत तावडे, आरोग्य पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचत गट प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, शाळेतील मुले आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर चिपी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कालवंडवाडी येथील कुलस्वामिनी मंदिर परिसरात आणि पोयचाख येथेही बंधारे बांधण्यात आले. या दोन्ही ठिकाणी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, अंगणवाडी व आशा सेविका, बचत गटाच्या महिला आणि वाडीतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.पोलिसांनी केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता जलसंधारणासारख्या सामाजिक कार्यात घेतलेला पुढाकार हा इतरांसाठी आदर्श ठरत आहे.
konkansamwad 
