शिरोड्यात भव्य रक्तदान शिबिर; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
शिरोडा
उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा येथे रामपुरुष युवा मित्र मंडळ, परबवाडा यांच्या वतीने मंगळवार दिनांक 2 मे 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी गोवा मेडिकल कॉलेज ब्लड बँकची विशेष टीम उपस्थित राहून रक्त संकलन करणार आहे.सामाजिक बांधिलकी जपत आणि गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे निरोगी व योग्य वयोगटातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेत रक्तदान करून समाजसेवेचा हातभार लावावा, असेही मंडळाच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.
konkansamwad 
