पुनम चव्हाण यांची शिवसेना महिला सेना 'तालुका प्रभारी' पदी नियुक्ती....कुडाळ आणि मालवण तालुक्याची जबाबदारी

पुनम चव्हाण यांची शिवसेना महिला सेना 'तालुका प्रभारी' पदी नियुक्ती....कुडाळ आणि मालवण तालुक्याची जबाबदारी

मालवण

 

      शिवसेना महिला सेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी पक्षांतर्गत महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर येथील सक्रिय कार्यकर्त्या, पालिकेच्या आरोग्य सभापती पुनम नागेश चव्हाण यांची शिवसेना महिला सेना कुडाळ, मालवण तालुका प्रभारी पदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना महिला सेना जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, स्थानिक पातळीवर आमदार निलेश राणे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पुनम चव्हाण या कुडाळ आणि मालवण तालुक्यात महिला सेनेचे कार्य विस्तारणार आहेत. नियुक्ती पत्रात नमूद केल्याप्रमाणे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करून, सौ. चव्हाण या आगामी काळात दोन्ही तालुक्यांतील महिलांचे संघटन मजबूत करतील. सर्व महिला भगिनींना व सहकाऱ्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी त्या जोमाने कार्य करतील, असा विश्वास शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी व्यक्त केला आहे. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, चित्रा हरमलकर, विद्या फर्नांडिस, सौ. प्रभाळे, मधुरा तुळसकर, रश्मी तुळसकर, नंदिनी हडकर, अक्षता गावडे आदी उपस्थित होत्या.