गणपतीपुळेत पाच पर्यटक बुडाले, दोघांना वाचविण्यात यश, तिघांचा शोध सुरु
रत्नागिरी
गणपतीपुळे येथे छत्रपती संभाजीनगर येथून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांपैकी पाच जण बुडाल्याची घटना आज शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यातील दोघांना वाचविण्यात यश आले असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास यातील काही सदस्य समुद्रात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा वेग आणि लाटांचा अंदाज न आल्याने पाचजण खोल पाण्यात ओढले गेले. ही गोष्ट लक्षात येताच किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी तसेच तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यातील दोघांना वाचविण्यात यश आले असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.
समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, समुद्रात सध्या पाण्याचा प्रबळ प्रवाह (करंट) असल्याने शोधमोहिमेला अडचणी येत आहेत.
konkansamwad 
