माणगाव दत्त मंदिरात गुरुद्वादशी उत्सवाचे आयोजन

माणगाव दत्त मंदिरात गुरुद्वादशी उत्सवाचे आयोजन

 

माणगाव

 

       श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या स्थापित श्री दत्त मंदिर, माणगाव (ता. कुडाळ) येथे येत्या शनिवार दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री गुरुद्वादशी उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे.
     सकाळी अभिषेक पूजा, लघुरुद्राभिषेक तसेच दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी श्री. सुभाष परवार व सहकारी, गोवा यांचे सुश्राव्य कीर्तन व भजन होणार असून, सायंकाळी गोज्यातील बाल कीर्तनकारांचे चक्रकीर्तन रंगणार आहे.

 

या कीर्तन कार्यक्रमात

ह. भ. प. कु. ब्रह्म सुर्लकर,
ह. भ. प. कु. संचित मणेरीकर,
ह. भ. प. कु. सावली गांवकर,
ह. भ. प. कु. ईश्वरी कांदोळीकर
(ह. भ. प. श्री. सुहासहबुवा वझे यांचे शिष्य) सहभागी होणार आहेत.

सायंकाळी ६.०० वा. दीपोत्सव तर ७.०० वा. आरती, तीर्थप्रसाद व "श्री"चा पालखी सोहळा पार पडणार आहे.

      भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.