वेंगुर्ले येथे १ मे रोजी सादर होणार 'संगीत कुर्माख्यान नाटक'.... कांदळवन विभाग व वेंगुर्ले नगरपरिषदेचे आयोजन.

वेंगुर्ले येथे १ मे रोजी सादर होणार 'संगीत कुर्माख्यान नाटक'.... कांदळवन विभाग व वेंगुर्ले नगरपरिषदेचे आयोजन.

 

वेंगुर्ले

 

    कांदळवन विभाग दक्षिण कोकण, वनपरिक्षेत्र कांदळवन मालवण आणि नगरपरिषद वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १ मे २०२६ रोजी सायंकाळी वेंगुर्ले येथे वन्यवाणी फाऊडेंशन निर्मित समुद्री कासव संवर्धनावर आधारित लोककलांच्या माध्यमातून रचलेले पहिले विनोदी वन्यजीव नाटक "संगीत कुर्माख्यान" आयोजित करण्यात आले आहे. वेंगुर्ले कॅम्प येथील नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह वेंगुर्ला येथे सायंकाळी ७ वाजता हे नाटक सुरू होणार आहे. संगीत कुर्माख्यान या नाटकाचा प्रयोग सर्व रसिक प्रेमीं आणि निसर्ग प्रेमी प्रेक्षकांसाठी विनामुल्य आयोजित केले आहे. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी या नाटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.