कुडाळ नेरुरपार येथे रानभाज्या ओळख आणि पाककृती कार्यशाळेचे आयोजन

कुडाळ नेरुरपार येथे रानभाज्या ओळख आणि पाककृती कार्यशाळेचे आयोजन

 

कुडाळ

 

     वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुरपार कुडाळ यांच्यावतीने नेरुरपार येथे 2 ते 5 जुलैपर्यंत रानभाज्या ओळख आणि पाककृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 10 ते 5 या कालावधीत रानभाज्यांची ओळख, रानभाज्या पाककला व डोंगररानावर रानभाज्यांचा शोध याविषयी रामचंद्र शृंगारे व डॉ. बाळकृष्ण गावडे याच्याकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेसाठी प्रवेश शुल्क २००० -/-  असून यामध्ये चहा नाश्ता व दुपारचे जेवण देण्यात येणार आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी 8275771369 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन वसुंधरा विज्ञान केंद्र नेरूरपार यांच्याकडून करण्यात आले आहे.