इन्सुलीत विहिरीत कोसळला बिबट्या

इन्सुलीत विहिरीत कोसळला बिबट्या

 

सावंतवाडी

 

     इन्सुली भिसेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला सावंतवाडी वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. बिबट्या हा साधारण आठ ते नऊ वर्षाचा आहे. त्याच्यावर कोणत्याही जखमा झालेल्या नाहीत. त्यामुळे त्याला  दाजीपुर येथील अभयारण्यात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सावंतवाडीचे वन अधिकारी सुहास पाटील यांनी दिली.