निवती पोलीस ठाण्याने साजरा केला ७७ वा प्रजासत्ताक दिन
निवती
निवती पोलीस ठाण्याने 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ध्वजारोहणाचा समारंभ निवती रॉक येथे पार पडला. ध्वजारोहणाचा मान निवती मेढा गावचे मच्छिमार श्रीधर मेतर यांना देण्यात आला होता.ध्वजारोहणानंतर, निवती पोलीस ठाणे चे प्रभारी अधिकारी भीमसेन गायकवाड यांनी सलामी दिली. या कार्यक्रमात कोस्ट गार्ड, फिशरीज, मेरिटाईन आणि निवती मेढा गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 60 ते 65 बोटी घेऊन ध्वजास वंदन करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व समुद्री आणि किनारी सुरक्षा यंत्रणांची उपस्थिती होती. कोस्ट गार्ड, फिशरीज आणि मेरिटाईन या संस्थांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता.निवती मेढा गावचे नागरिक आणि स्थानिक मच्छिमार समुदायाने या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल निवती पोलीस ठाण्याचे अभिनंदन करण्यात आले.

konkansamwad 
