वेंगुर्लेतील खाडीत पडून मच्छिमाराचा दुर्दैवी मृत्यू.....पारंपरिक मासेमारी करताना गेला तोल

वेंगुर्लेतील खाडीत पडून मच्छिमाराचा दुर्दैवी मृत्यू.....पारंपरिक मासेमारी करताना गेला तोल

वेंगुर्ले

 

     वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा खालची केरवाडी येथील रहिवासी हिरोचन लक्ष्मण चोपडेकर (वय 50) यांचा केरवाडी खाडीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत चोपडेकर हे ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घराजवळील खाडीत पारंपरिक पद्धतीने मच्छिमारी करत होते. यावेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाडीपात्रातील खोल पाण्यात पडले. यातच त्यांचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती त्यांचे भाऊ बाळकृष्ण लक्ष्मण चोपडेकर यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या जबाबावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रसाद कदम या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.