सावंतवाडीच्या वाहतूक कोंडीला पूर्णविराम!.....गणेशोत्सवापासून वन-वे आणि स्वतंत्र पार्किंग झोन लागू

सावंतवाडीच्या वाहतूक कोंडीला पूर्णविराम!.....गणेशोत्सवापासून वन-वे आणि स्वतंत्र पार्किंग झोन लागू

सावंतवाडी


       सावंतवाडी शहरात सतत उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीवर अखेर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आला आहे. पुढील दोन दशकांतील वाढती वाहनसंख्या लक्षात घेऊन नगरपालिकेने मोकळ्या जागा, रस्ते, वन-वे पार्किंग आणि स्वतंत्र पार्किंग झोनचा सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. येत्या गणेशोत्सवापासून या नवीन वाहतूक नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी केली.सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस प्रशासन, आरटीओ, एसटी महामंडळ या शासकीय यंत्रणांसह स्थानिक व्यापारी, रिक्षा व टेम्पो चालक-मालक आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहमतीने शहराला शिस्तबद्ध रूप देण्यासाठी या नव्या आराखड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.या बैठकीला पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, आरटीओ अधिकारी संकेत सोमनांचे, एसटी वाहतूक व्यवस्थापक गौतमी कुबडे, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्यासह आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, नीलम नाईक, ॲड. सिद्धार्थ भाबुरे, अजय गोंदावले, ॲड. सायली दुभाषी, देवेंद्र टेमकर, तौकीर शेख, सुनिता पेडणेकर, स्नेहा नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, राजू मसुरकर, विशाल सावंत, बाळू सावंत, जगदीश मांजरेकर, बाळासाहेब बोर्डेकर, श्रीपाद चोडणकर, पुंडलिक दळवी, राजू पनवेलकर, दत्ता सावंत, सुनील नाईक, सुधीर पराडकर, सतीश नार्वेकर, हेमंत मुज, रवींद्र प्रभू आणि बाळू सावळे यांसह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.