साळीस्ते येथे कंटेनरला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

साळीस्ते येथे कंटेनरला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

कणकवली

 

     मुंबई-गोवा महामार्गावरील साळीस्ते येथे बुधवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या HR 61D 1261 क्रमांकाच्या कंटेनरला मागून TVS रेडर दुचाकीने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.अपघाताची माहिती मिळताच तळेरे बाजारपेठ मित्रमंडळाच्या रुग्णवाहिकेने जखमीला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.अपघातग्रस्त दुचाकी ही TVS कंपनीची रेडर असल्याची माहिती मिळाली आहे. मृत दुचाकीस्वाराची ओळख अद्याप समजू शकलेली नाही. या अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.