मेढा-निवतीत एकदिवसीय पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

मेढा-निवतीत एकदिवसीय पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

म्हापण 


 
    जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि पंचायत समिती वेंगुर्ला तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालय, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ॲस्कड’ अंतर्गत माहिती, शिक्षण व जनसंपर्क अभियानांतर्गत मेढा-निवती ग्रामपंचायत कार्यालय येथे मंगळवारी एकदिवसीय पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला शेतकरी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या यज्ञा साळगांवकर होत्या, तर उद्घाटक म्हणून वेंगुर्ले पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन देसाई उपस्थित होते. यावेळी मेढा-निवती ग्रामपंचायत सरपंच अवधूत रेगे, पंचायत समिती सदस्य विष्णू उर्फ आप्पा फणसेकर, जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय) डॉ. समीर बिलोलकर, पंचायत समिती वेंगुर्लेचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पशुवैद्यकीय अधिकारी सागर चव्हाण (होडावडा), डॉ. आकाश कलाल (वेतोरे), डॉ. प्रियांका टिकोरे (शिरोडा), पशुधन विकास अधिकारी विजय म्हापणकर, तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. उमेश पेडूरकर (कोचरे), जे.बी. जानकर, डी. एस. वेंगुर्लेकर, कविता परब, पत्रकार संदीप चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत उपसरपंच प्रज्योत मेतर, ग्रामविकास अधिकारी शरद शिंदे, ग्रामपंचायत सदस्या तृप्ती कांबळी, प्राजक्ता निवतकर, गुरुष्का कोचरेकर, अमिषा आमडोस्कर, नमिता घाटवळ, शीतल पाटकर तसेच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रशिक्षण शिबिरात पशुवैद्यकीय अधिकारी सागर चव्हाण, डॉ. आकाश कलाल, डॉ. प्रियांका टिकोरे, विजय म्हापणकर आणि डॉ. विद्यानंद देसाई यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये पशुधन व्यवस्थापन, वैरण विकास योजना, जंतनाशक व गोचीड प्रतिबंधक उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.तसेच पशुधनातील विविध साथीचे रोग, त्यावरील नियंत्रणात्मक उपचार आणि रोगप्रतिबंधक लसीकरण याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. गाई-म्हशींमधील कृत्रिम रेतन, वंध्यत्वाची कारणे व त्यावरील उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली. सध्या मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या लंपी चर्मरोगाची लक्षणे, त्यावरील उपाय आणि लसीकरणाचे महत्त्व याविषयीही शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.याशिवाय पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.