परुळे जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात.....पाककला स्पर्धेत पालकांचा उत्स्फूर्त सहभाग
परुळे
जिल्हा परिषद केंद्र शाळा परुळे क्रमांक ३ येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ‘निपुण माता’ पालकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापिका श्रीम. प्रविणा दाभोलकर यांनी उपस्थित माता-पालकांना निपुण महाराष्ट्र अभियान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.महिला दिनानिमित्त शालेय स्तरावर माता-पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध घरगुती पदार्थ सादर केले. स्पर्धेसाठी पाककृती स्वतः बनवलेली असावी, त्यामध्ये पोषक मूल्यांचा समावेश असावा, कृत्रिम रंग, फास्ट फूड किंवा बाहेरील पदार्थ नसावेत तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीस पोषक असाव्यात, असे निकष ठेवण्यात आले होते.यावेळी आरोग्य सेवक शिवाजी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहाराचे महत्त्व स्पष्ट करत मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षण आरोग्य विभागाचे श्री. चव्हाण व श्रीम. सानिका परुळेकर यांनी केले.या पाककला स्पर्धेत सौ. श्रुती सुशांत सामंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक सौ. अंजली सिद्धिविनायक तेली तर तृतीय क्रमांक सौ. शीतल सामंत यांनी मिळवला.बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी मुख्याध्यापिका प्रविणा दाभोलकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दर्शना नानचे, सानिका परुळेकर, शंकर घोगळे तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

konkansamwad 
