निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या अडी-अडचणी संदर्भात ४ नोव्हेंबर रोजी बैठक

निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या अडी-अडचणी संदर्भात ४ नोव्हेंबर रोजी बैठक

 

सिंधुदुर्गनगरी

 

         निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या अडी-अडचणी संदर्भात कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दि. 4 नोव्हेंबर, 2025 रोजी सकाळी 11. 30 वाजता बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे अपर कोषागार अधिकारी संजय घोगळे यांनी कळविले आहे.
      या बैठकीमध्ये बँकेच्या व शासनाच्या सेवेसंदर्भात येणाऱ्या अडी-अडचणीवर उपाय योजनासाठी चर्चा केली जाते. निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी तक्रारी/हरकतीसह बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहनही श्री. घोगळे यांनी केले आहे.