परुळे विद्यामंदिरचे एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यश

परुळे विद्यामंदिरचे एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यश

 

वेंगुर्ला 


       डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेत  वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेने उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. या प्रशालेचे दहा विद्यार्थी उत्तीर्ण होऊन एका विद्यार्थ्याची राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. यावर्षीही प्रशालेने या परीक्षेतील आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. हार्दिक गोपीनाथ भांगरे या विद्यार्थ्याने अ.ज. प्रवर्ग गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला. आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांना चार वर्षांसाठी दरमहा रु. १०००/- (वार्षिक रु. १२०००/-)  शिष्यवृत्ती मिळणार आहे.याबरोबरच वरद भानुदास बिडये, वरद सुमन राणे, रंजना विनोद राणे व कौस्तुभ रुपेश राणे हे चार विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. या विद्यार्थ्यांना चार वर्षासाठी दरमहा रु. ८००/-  (वार्षिक रु.९६००/-) शिष्यवृत्ती मिळणार आहे.तसेच प्राची जयराम खुळे, श्रेया योगेश पार्सेकर, हर्षदा उमेश लांबर, भार्गवी रविंद्र म्हापणकर व ओंकार अमित चव्हाण हे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले.या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका रीमा ठाकूर, सोमनाथ बागुल, मधुरा कदम, अमेय देसाई,  प्रभू पंचलिंग, वैशाली भांगरे व तेजश्री सावंत यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष अविनाश देसाई, संस्था उपाध्यक्ष डॉ. उमाकांत सामंत, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय देसाई, प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन माने, पालक, ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.