फोंडाघाटात पेट्रोल-डिझेल टँकर कलंडला
कणकवली
फोंडाघाटातील खिंडीपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर सिंधुदुर्गाच्या हद्दीत येणारा पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारा टँकर अचानक रस्त्यालगतच्या बांधलेल्या गटारात कलंडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. टँकरमध्ये प्रज्वलनशील इंधन असल्यामुळे मोठ्या आगीचा धोका निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायतीचा पाण्याचा टँकर,जेसीबी व इतर आग प्रतिबंधक यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. महसूल आणि पोलीस विभागाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्यानंतर आणि आग लागण्याचा संभव लक्षात घेऊन काळजीपूर्वक टँकर गटारातून बाहेर काढण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
konkansamwad 
