सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी वैभववाडी येथील संजय सावंत यांची बिनविरोध निवड

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी वैभववाडी येथील संजय सावंत यांची बिनविरोध निवड

 

कुडाळ

 

    सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी वैभववाडी येथील संजय सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.कुडाळ येथील वासुदेवानंद सभागृहात जिल्हा व्यापारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या सभेमध्ये पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, सर्व निवडी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि बिनविरोध झाल्या आहेत. या नवीन कार्यकारिणीमध्ये कार्यवाह म्हणून तळेरे येथील राजू जठार, तर सहकार्यवाह म्हणून कुडाळचे राजन नाईक यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदाची जबाबदारी बागायतचे दीपक भोगले, सावंतवाडीचे पुंडलिक दळवी आणि कुडाळचे अवधूत शिरसाट यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच कोषाध्यक्ष म्हणून वेंगुर्ले येथील नंदन वेंगुर्लेकर काम पाहणार आहेत. कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रसाद पारकर, श्रीपाद चोडणकर, प्रल्हाद पावले, संजय भोगटे, दीपक बेलवलकर, गणेश बोर्डेकर, हर्षल बांदेकर, विजय केनवडेकर, संतोष नानचे, नंदकिशोर टोपले, सुधीर साटम, अश्विन पांगम आणि दिगंबर तांडेल यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच स्वीकृत सदस्य म्हणून सौ. तृप्ती पारकर, अरविंद नेवाळकर, श्रीराम शिरसाट आणि निलेश धडाम यांचा समावेश करण्यात आला आहे. ही संपूर्ण निवड प्रक्रिया अनिल सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.