कोकणच्या आंबा-काजू उत्पादकांसाठी आज मुंबईत महत्त्वाची बैठक....

कोकणच्या आंबा-काजू उत्पादकांसाठी आज मुंबईत महत्त्वाची बैठक....

 

कणकवली 

 

   कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या झालेल्या नुकसानीवर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्या विधान भवन आत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमुळे आता सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे.सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकत्याच झालेल्या शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चावेळी मुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह कोकणातील सर्व प्रमुख मंत्री, आमदार, खासदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आंबा-काजू बागायतदारांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करून त्यांना ठोस दिलासा देणारे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.