संविधान हत्या दिवसाच्या निमित्ताने वेंगुर्लेत आणीबाणीत तुरुंगवास भोगलेले प्रभाकर मराठे यांचा सन्मान
वेंगुर्ला
देशात ५१ वर्षापुर्वी लादण्यात आलेली आणीबाणी म्हणजे हुकुमशाही राजकीय प्रवास आणि स्वातंत्र्य्याची गळचेपी होती. भारतीय संविधानाच्या तरतुदीचा दुरूपयोग करण्यात आला होता. त्यामुळे या परिस्थिती विरोधात त्यावेळी उभारलेला लढा म्हणजे दुसरे स्वातंत्र्य युद्ध होते. आणि या अनुशंगाने त्यावेळचा १४ महीन्यांचा तुरुंगवास भोगलेले वेंगुर्ले भटवाडी येथील रा.स्वं.संघाचे प्रभाकर मराठे यांचा सन्मान प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी केले.तत्कालीन काँग्रेस शासीत केंद्र सरकारने २५ जुन १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती.२१ मार्च १९७७ पर्यंत २२ महीने ही आणीबाणी लागु होती. या तात्कालिन सरकारच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांच्या स्वातंत्र्य्यावर घाला पडला होता .राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अन्य पक्ष व सामाजिक संघटनांनी या विरोधात आवाज उठवला होता. याचाच परिपाक म्हणुन देशवासियांना कोणत्याही क्षणी अटक करण्यास सुरुवात झाली होती. यात सिंधुदुर्गातील नागरीकांचा सामावेश होता.तात्कालिन सरकारच्या कार्यपद्धतीला २५ जुन रोजी ५१ वर्षे पुर्ण झाल्याने भाजपा च्या वतीने हा दिवस "संविधान हत्या दिवस" म्हणून पाळण्यात येतो. या निमीत्ताने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी रा.स्व.संघाचे कार्यकर्ते प्रभाकर मराठे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी भाजपाचे नरहरी खानोलकर, रा.स्वं संघाचे दिना आचार्य, यशवंत कुडपकर, मधुकर जोशी, विलास पालव, तांडेल उपस्थित होते.
konkansamwad 
