सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

ओरोस 


      "आमच्याकडे सोपविलेली जिल्हा बँकेची जबाबदारी पुढच्या पिढीकडे अधिक सक्षम स्थितीत सोपविणे हेच आमचे ध्येय आहे. सहकाराला समृद्धी देत त्यातून सिंधुदुर्गची समृद्धी साध्य करण्यासाठी यापुढेही एकजुटीने काम करू," असा निर्धार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केला.सिंधुदुर्गनगरी येथील बँकेच्या प्रधान कार्यालयात दळवी यांच्या 45 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या साडेचार वर्षांत बँकेने 17 ते 20 टक्क्यांपर्यंत व्यवसायवाढ साध्य करून व्यवसाय, नफा व उत्पन्न दुपटीपर्यंत नेण्यात यश मिळविले असल्याची माहिती त्यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहक, शेतकरी, महिला व युवकांना अधिक सक्षम सेवा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी दळवी यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या शुभेच्छा पुढील कामासाठी ऊर्जा देतात, पण जबाबदारीही वाढवतात असे सांगत दळवी म्हणाले, "आपल्या पदाचा उपयोग केवळ दैनंदिन कामकाजापुरता न करता समाजाच्या हितासाठी कसा करता येईल याचे मार्गदर्शन ज्येष्ठ नेते नारायणराव राणे यांनी वेळोवेळी केले. त्यातूनच संस्थेच्या कामकाजाला व्यापक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला."
     या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार संजय उपाध्याय, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक गजानन गावडे, महेश सारंग, रवींद्र मडगावकर, विठ्ठल देसाई, नागेश मोर्य, आत्माराम ओटवणेकर, समीर सावंत, गणपत देसाई, विद्यानंद परब, विद्याप्रसाद बांदेकर यांच्यासह जिल्हाभरातील बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार संजय उपाध्याय, संजू परब, विद्याप्रसाद बांदेकर, गजानन गावडे, नागेश मोर्ये यांनी दळवी यांच्या सहकारातील नेतृत्वाचे गुणगान केले.