सावंतवाडी आणि मालवण पोलीस ठाण्यात नवीन पोलीस निरीक्षकांची नियुक्ती
सावंतवाडी
जिल्ह्यात दोन वर्षे कारकीर्द पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी ओरोस मुख्यालयात कार्यरत असले राजेंद्र मगदूम यांची सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे मालवण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी अतुल जाधव यांची नियुक्ती झाली आहे. या बदल्या सोबतच सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांचीही मालवण पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय सोयीसाठी या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
konkansamwad 
