गोवा बनावटीची दारू वाहतुकीप्रकरणी ठाणेकर ताब्यात, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
बांदा
बांदा येथील जुना पत्रादेवी रोडवरील आरोसबाग तिठ्याजवळ राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी राखाडी रंगाची टोयोटा इनोव्हा गाडी पकडून ठाण्यातील रितेश प्रभू म्हात्रे वय ३५, रा. तुर्भे याला ताब्यात घेतले. गाडीच्या मागील सीटवर आणि डिकीमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे ३० बॉक्स आढळून आले असून ४ लाख २४ हजार ८० रुपये किमतीचा दारूसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेली ६ लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण १० लाख २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास मिलिंद माळी करत आहेत.
konkansamwad 
