मत्स्य विभागात २५४ पदांची मेगाभरती.....मंत्री नितेश राणे यांची माहिती
कणकवली
राज्याचे मत्स्य व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या महत्त्वपूर्ण पुढाकारामुळे मत्स्य विभागात २५४ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही प्रक्रिया राबवली जात असून यामुळे राज्यातील पदवीधर तरुणांसाठी शासकीय सेवेत रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मत्स्य विभागाच्या इतिहासात प्रथमच लागू करण्यात आलेल्या नवीन आकृतीबंधामुळे विभागातील मनुष्यबळात मोठी वाढ होणार आहे. या भरतीमुळे किनारपट्टी भागातील विकासकामे, मत्स्य संवर्धन आणि मच्छीमारांना तांत्रिक मार्गदर्शन देण्याच्या कामाला कमालीची गती मिळेल.या निर्णयामुळे २५४ मत्स्यविज्ञान पदवीधरांना थेट रोजगार मिळून अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभणार आहे.नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर विभागाचे कामकाज अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होणार असून, हा निर्णय किनारपट्टी आणि मत्स्य व्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरेल.
konkansamwad 
