बैलांची वाहतूक केल्याप्रकरणी माडखोल येथे दोघे ताब्यात .....सावंतवाडी पोलिसांची कारवाई
सावंतवाडी
बैलाची वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५० हजाराच्या दोन बैलांसह ४ लाखाची गाडी, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्यामसुंदर परशुराम नाईक (रा. आंबडपाल, ता. कुडाळ), प्रथमेश प्रसाद सामंत (रा. कुडाळ, एमआयडीसी) या दोघांची नावे आहेत.जप्त करण्यात आलेली गाडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे तर संबंधित बैल हे गोशाळेत पाठवण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार सुरेश पाटील यांनी दिली असून त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील आणि मनोज राऊत यांच्याकडून करण्यात आली. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेले काही दिवस सावंतवाडी पोलिसांनी अवैद्य गुरे वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात मोहीम उठवली आहे.या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
konkansamwad 
