विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्या प्रकरणी दाभोली येथील एका विरोधात गुन्हा दाखल

विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्या प्रकरणी दाभोली येथील एका विरोधात गुन्हा दाखल

वेंगुर्ले

 

     तालुक्यातील दाभोली राजापूरवाडी येथील विवेक अर्जुन राजापूरकर (वय ४२) याच्या जवळ एक सिंगल बॅरेल ठासणीची बंदूक बेकायदेशीर रित्या विनापरवाना मिळून आली. या प्रकरणी त्याच्या विरोधात वेंगुर्ले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दाभोली-राजापूरवाडी येथील राजापूरकर याच्या जवळ विनापरवाना ठासणीची बंदूक असल्याची माहिती वेंगुर्ले पोलिसांना मिळाली.त्यानुसार तपासणी केली असता त्याच्याजवळ ही बंदूक सापडून आली. अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी शस्त्र अधिनियम कलम – ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पो. हे. कॉ. चव्हाण करीत आहेत.