जिल्हा प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद.....परुळे बाजार व मेढा ग्रामपंचायतीकडून 'वनराई बंधारे' मोहिमेचा शुभारंभ

जिल्हा प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद.....परुळे बाजार व मेढा ग्रामपंचायतीकडून 'वनराई बंधारे' मोहिमेचा शुभारंभ

 

परुळे 



     दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना जास्तीत जास्त बंधारे बांधून पाणी साठवणूक करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत परुळे बाजार व मेढा ग्रामपंचायतीने 'वनराई बंधारे' मोहिमेचा शुभारंभ केला आहे.परुळे बाजार ग्रामपंचायतीने परिसरात बंधाऱ्यांच्या कामाला सुरुवात केली असून यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच प्राजक्ता पाटकर, सदस्य अभय परुळेकर, संजय दुधवडकर, पोलीस पाटील संदेश पवार, महिला बचत गट प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ व ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे उपस्थित होते.तर मेढा ग्रामपंचायतीने शेळपी परिसरात तीन वनराई बंधारे बांधून एक आदर्श निर्माण केला आहे. यावेळी सरपंच अवधूत रेगे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, श्रीरामवाडी व शेळपी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे उपस्थित होते.