महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी स्मृती वर्षानिमित्त  जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी स्मृती वर्षानिमित्त  जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

 सिंधुदुर्ग



     महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी स्मृती वर्षानिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ८ ऑक्टोबर रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील आठ शासकीय वसतिगृहांमधील १३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी स्मृती वर्षाचे औचित्य साधून शासनाच्या वतीने तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील या स्पर्धेतून शालेय स्तरावरील एक, उच्च माध्यमिक स्तरावरील दोन आणि महाविद्यालयीन स्तरावरील दोन, असे एकूण पाच विद्यार्थी विभागीय स्तरावरील स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली.स्पर्धेचे परीक्षण नाथपंथी गोसावी आश्रमशाळा, बोर्डवे, ता. कणकवली येथील मुख्याध्यापक आनंद कर्पे आणि समाज कल्याण विभागाचे विशेष अधिकारी तुषार गवळी यांनी केले. यावेळी आनंद कर्पे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना वक्तृत्व कलेचे नियम, प्रभावी सादरीकरण आणि भाषण करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.स्पर्धेसाठी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, विशेष अधिकारी तुषार गवळी, शासकीय वसतिगृहांचे गृहपाल तसेच समाज कल्याण विभागाच्या जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.