मालवणहून ठाण्याकडे जाणाऱ्या कारला अपघात

मालवणहून ठाण्याकडे जाणाऱ्या कारला अपघात

 

रत्नागिरी


 

        रत्नागिरी येथील संगमेश्वर- देवरुख मार्गावर बुरुंबी मधील दादासाहेब सरफरे विद्यालयासमोर एक गंभीर अपघात झाला. शाळेसमोर रस्त्यावर उभा असलेला बलकर कंटेनर (MH13 DQ7747) काही कारणास्तव बंद अवस्थेत रस्त्यावर उभा होता. या कंटेनरमध्ये सोलापूरहून संगमेश्वरकडे सिमेंट भरलेली मालवाहतूक सुरू होती. दरम्यान, मालवणहून ठाण्याकडे जात असलेली MH04 KA 0094 ही रेनॉल्ड क्विड कार अचानक अनियंत्रित झाली. कारचा वेग आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ती थेट समोरील कंटेनरच्या मागील टायरखाली जाऊन धडकली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले, मात्र पुढील एअरबॅग्स वेळेवर उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.या अपघातात कारमधील श्री.रुपेश सहदेव पालव (वय 43), श्रीम. सुविधा सहदेव पालव (वय 65), कु. ऋतुजा रुपेश पालव (वय 36) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.