माडखोल येथे कारची दुचाकीला धडक, कारीवडे येथील युवक जखमी

माडखोल येथे कारची दुचाकीला धडक, कारीवडे येथील युवक  जखमी

सावंतवाडी

 

     कोल्हापूर येथील पर्यटकांच्या भरधाव कारने धडक दिल्याने कारीवडे येथील युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात  माडखोल-सापळे स्टॉप येथे घडला. कॅल्व्हिस्टर उर्फ कॅलू गोन्स (वय ३३) असे त्या युवकाचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.संबंधित कारचालक कोल्हापूर येथील असून अपघातानंतर त्यांनी पलायन केले आहे. त्यामुळे जखमी अवस्थेत असलेला कॅलू हा घटनास्थळी रस्त्यावर पडून राहिला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी धाव घेऊन त्याला अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. संबंधित तरुणांचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.