नाना पाटेकर यांच्या निधनाने कोकणसह महाराष्ट्रावर शोककळा....खासदार नारायण राणे यांची भावपूर्ण श्रद्धांजली
सिंधुदुर्ग
ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे.नाना पाटेकर यांच्या निधनाने खासदार नारायण राणे यांनी भावुक होत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
राणे म्हणाले, "नारायण तू कसा आहेस असे मला हक्काने विचारणारा एक अतिशय जवळचा मित्र आज मी गमावला आहे. नाना एक अष्टपैलू आणि महान कलाकार तर होतेच तसेच ते कोकणच्या मातीचे खरे सुपुत्र होते. चित्रपटसृष्टी गाजवतानाही त्यांचे पाय नेहमी जमिनीवर राहिले. 'नाम फाऊंडेशन'च्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि गोरगरिबांसाठी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही. आमच्यातील वैयक्तिक आपुलकी आणि आपापसातील स्नेह नेहमीच खास होता. त्यांच्या जाण्याने केवळ चित्रपटसृष्टीचेच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि पाटेकर कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती!"
konkansamwad 
