देवगड येथे ८ कोटींची अंबर ग्रीस जप्त, तिघांना अटक  

देवगड येथे ८ कोटींची अंबर ग्रीस जप्त, तिघांना अटक  

देवगड


     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात वनविभागाने अंबर ग्रीस तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तळेबाजार येथे सापळा रचून 8 कोटी रुपये किंमतीची 8 किलो 800 ग्रॅम व्हेल माशाची उलटी अर्थात अंबर ग्रीस जप्त करण्यात आली. या प्रकरणी तिघांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांना तळेबाजार येथे अंबर ग्रीस विक्रीसाठी काही इसम येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सहायक वनसंरक्षक डॉ. एस. के. लाड यांच्या नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल कणकवली एस. एस. पाटील यांच्या पथकाने बनावट ग्राहक तयार करून पाठवले. विक्रीसाठी आलेल्या 3 इसमांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. यामध्ये योगेश गणपत करंजेकर, (42), रा. इळये,  विष्णू धाकू धुरत (33) रा. आनंदवाडी, संतोष काशीराम नाडणकर (56) बरेली
      या तिघांविरुद्ध देवगड राऊंड गुन्हा क्र. WL 01/2027 नुसार वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 44, 49, 49(B), 51 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.