आशिये गावच्या विकासाला पर्यटन संकेतस्थळ दिशा देईल. : आ.नितेश राणे आशिये ग्रामपंचायत नूतन इमारतीचे आ.नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण.
कणकवली.
आशिये गावात त्रिदल महोत्सवच्या निमित्ताने सुंदर आयोजन केले गेले आहे. गाव जरी लहान असले तरी हा कार्यक्रम खरोखरच आर्थिक समृध्दी देणारा आहे. आशिये गावच्या विकासाला पर्यटन संकेतस्थळ दिशा देईल. या गावाच्या विकासाचा पाया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रचला आहे. लोकांच्या आयुष्यात सुधार कसा आणता येईल ? यासाठी आमचे प्रयत्न आहे. यापुढेही राहतील गावच्या विकासासाठी सरपंच किंवा लोकप्रतिनिधी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. असे आ. नितेश राणे म्हणाले. यावेळी ते व्यासपीठावर बोलत होते.
येथील आशिये ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आ.नितेश राणे यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाला.दरम्यान यावेळी आशिये गावातील महिलांनी नूतन ग्रामपंचायतच्या इमारतीत ५० दिव्यांचे दिवे प्रज्वलित केले.
कार्यक्रमात व्यासपीठावर माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत, गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर, विस्तार अधिकारी श्री. वारंग, उपसरपंच संदीप जाधव, ग्रामसेवक राकेश गोळवणकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, सोनू सावंत, संतोष कानडे, महेश लाड, समीर प्रभुगावकर, निलेश ठाकूर, प्रवीण ठाकूर, समीर ठाकूर, अविराज मराठे, विक्रम बाणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश ठाकूर यांनी केले तर आभार सरपंच महेश गुरव यांनी केले.
दरम्यान आ. नितेश राणे म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टीने लोकांना येण्यासाठी कारणे तयार करायला लागतील. पर्यटनाच्या माध्यमातून विकास गतीने होईल. गोवा छोटे राज्य असूनही त्या राज्याचे अडीज लाख रुपये दरडोई उत्पन्न आहे. जर गावात पर्यटक यायला पाहिजे, तर त्यासाठी काय करावे हे देखील एक प्रश्न आहे. जसे देवगड तालुक्यात पर्यटक येण्यासाठी कंटेनर चित्रपट गृह, व्हॅक्स म्युझियम सारखी पर्यटन साधने उपलब्ध होत गरजेचे आहे. अनेक लोक माझ्यावर टीका करतात की, नितेश राणेंनी केलेले प्रकल्प बंद पडले. मात्र ते प्रकल्प सुरू करण्यासाठी नितेश राणेंनी प्रयत्न केले हे तितकंच महत्वाचे आहे. गावच्या विकासासाठी मदत कमी पडू देणार नाही. असे आश्वासन आ. नितेश राणे यांनी दिले.
यावेळी बोलताना विलास खानोलकर म्हणाले, आशिये गावात पहिल्यांदा केंद्रीय मंत्री नारायण राणे आले. दरम्यान तेव्हाची परिस्थिती ही बिकट परिस्थिती होती. जेव्हा केंद्रीय मंत्री ना.राणे नदीतून चालत आले होते. तेव्हापासून आशिये गावातील ग्रामस्थ हे राणे कुटुंबियांसमवेत आहेत. तेव्हा पासून आज पर्यंत आशिये गाव राणे कुटुंबाशी प्रामाणिकपणे राहिलेला आहे. आजही आशिये गावाचा विकास हा राणे कुटुंबामुळेच होताना दिसत आहे. सरपंच महेश गुरव यांनी आशिये गावाला दिशा देण्याचे काम केलं आहे. जि. प. चे माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांनी देखील आशिये गावासाठी भरघोस निधी देण्याचे प्रयत्न केले. यावेळी शुभेच्छा देताना गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.

konkansamwad 
