फोरेन्सिक सायन्स विषयात प्रथम आलेल्या सॅंड्रा फर्नांडिसचा सत्कार.

वेंगुर्ला.
गूढ निर्माण करणाऱ्या गुन्ह्याच्या शोधकार्यात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या 'फोरेन्सिक सायन्स' या विषयात मदर तेरेसा स्कूलची माजी विद्यार्थिनी कु.सॅंड्रा फर्नांडिस हिने प्रथम क्रमांक मिळवला.या तिच्या यशाबद्दल मदर तेरेसा स्कूलच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक फा. फेलिक्स लोबो, संस्थेचे व्यवस्थापक व वेंगुर्ला चर्चचे धर्मगुरु फा. फ्रान्सिस डिसोजा यांच्या उपस्थितीत तिचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.