परुळे बाजारात पाणी बचतीचा संदेश देणारे पथनाट्य संपन्न

परुळे बाजारात पाणी बचतीचा संदेश देणारे पथनाट्य संपन्न

परुळे 


     दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा संदेश देणारे जनजागृतीपर पथनाट्य परुळे बाजार येथे संपन्न झाले.एस. एल. देसाई विद्यामंदिर, पाट आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा परुळे यांच्या संयुक्त विद्यमाने परुळे बाजारपेठ येथे या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.'पाणी अडवा, पाणी जिरवा' मोहिमेअंतर्गत वनराई बंधारे, कच्चे बंधारे बांधणे, वृक्षतोड थांबवणे याबाबत जनजागृती करण्यासाठी हे नाट्य सादर करण्यात आले.यावेळी सरपंच प्रणिती आंबड-पालकर, उपसरपंच प्राजक्ता पाटकर, सदस्य सुनाद राऊळ, नमिता परुळेकर, अभय परुळेकर, तन्वी दूधवडकर, तंटामुक्त अध्यक्ष विजय परब यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशालेचे शिक्षक वर्गही उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने पथनाट्य टीमचे स्वागत करण्यात आले.