केकेव्हीअन्स फाउंडेशन तर्फे मोफत नेत्र चिकित्सा शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

मालवण
श्री देवी केळबाई वार्षिक उत्सवाचे औचित्य साधून केकेव्हीअन्स वसुंधरा फाउंडेशन कोल्हापूर(माजी कृषी पदवीधारक) व समस्त मयेकर बंधू मंडळ मुंबई यांनी संयुक्तपणे समता फाउंडेशन मुंबईच्या मदतीने श्री देवी केळबाई मंगल कार्यालय वायरी मालवण या ठिकाणी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. 100 पेक्षा जास्त ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला. एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटलचे डॉ. संजय जोशी यांनी नेत्र तपासणी करून शिबिरास आलेल्यांना योग्य सल्ला दिला. तसेच ज्यांच्यावर शस्त्रक्रिया आवश्यक आहेत त्यांना समता फाउंडेशन तर्फे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यावेळी फाउंडेशनचे अमित वालावलकर, प्रा. महेश परुळेकर, समता फाउंडेशनचे सुहास लाटकर, मयेकर बंधू मंडळ मुंबईचे अध्यक्ष बळवंत मयेकर, सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर व खजिनदार प्रमोद मयेकर उपस्थित होते. शिबिराच्या समारोपानंतर अमित वालावलकर यांनी सर्वांचे आभार मानले.