परुळे येथे आजपासून महाशिवरात्रोत्सवाला सुरुवात

परुळे येथे आजपासून महाशिवरात्रोत्सवाला  सुरुवात

 

परुळे

 

       परुळे येथील श्री देव गौरीशंकर मंदिर येथे १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.उत्सवाची सुरुवात गुरुवार दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पालखी व मंदिर सजावटीने होणार आहे. रात्री ९ वाजता पुराण वाचन, ९.३० वाजता ‘श्रीं’ची पालखी प्रदक्षिणा, तर रात्री ११ वाजता शेळपी येथील ह.भ.प. दीपक सामंत यांचे कीर्तन होणार आहे.शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजीही रात्री ९ वाजता पुराण वाचन, ९.३० वाजता पालखी प्रदक्षिणा आणि ११ वाजता ह.भ.प. दीपक सामंत यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र उत्सवानिमित्त सकाळी ८ वाजता धार्मिक विधी होणार आहेत. दुपारी ३.३० वाजता चिंतामणी सामंत (शेळपी) यांचे कीर्तन, सायंकाळी ७.४५ वाजता पुराण वाचन, रात्री ८ वाजता ‘श्रीं’ची पालखी प्रदक्षिणा, तर रात्री ९ वाजता श्री रामेश्वर वराठी दशावतार नाट्य मंडळ यांचे दशावतार नाटक सादर होणार आहे.या उत्सवासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.