मालवण येथे आढळले स्त्री जातीचे नवजात अर्भक

मालवण
मालवण तालुक्यातील कुंभारमाठ म्हाडा कॉलनी परिसरातील आंब्याच्या बागेत स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले. या प्रकारामुळे कुंभारमाठमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान नवजात अर्भकास येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून उपचार सुरू आहेत.कुंभारमाठ म्हाडा कॉलनी परिसरातील एका आंबा कलमाच्या बागेत एक नवजात अर्भक स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ पोलीस ठाण्यास देताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे, प्रतिज्ञा खोत, सुहास पांचाळ यांच्यासह अन्य पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. नवजात अर्भकास येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून उपचार सुरू आहेत. संशयित मातेचा पोलिसांकडून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.