नीरज चोप्राने जिंकले सुवर्णपदक......वर्ल्ड ॲथलेटिक्स स्पर्धेत फडकावला तिरंगा

नीरज चोप्राने जिंकले सुवर्णपदक......वर्ल्ड ॲथलेटिक्स स्पर्धेत फडकावला तिरंगा

 

दक्षिण आफ्रिका

 

 

         भारतासाठी दोन ऑलिंपिक पदके जिंकणारा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 2025 च्या हंगामाची धमाकेदार सुरुवात केली असून दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्टूम येथे झालेल्या पॉट इन्व्हिटेशनल ट्रॅक स्पर्धेत नीरजने सुवर्णपदकावर नाव कोरले. या स्पर्धेत त्याने 84.52 मीटर भालाफेक केली. तो सहा खेळाडूंमध्ये झालेल्या अंतिम फेरीत अव्वल स्थानावर तर द आफ्रिकेचा 25 वर्षीय डौव स्मिट (82.44 मीटर) दुस-या क्रमांकावर राहिला.या स्पर्धेत निरजचे चोप्राचे प्रदर्शन त्यांच्या वैयक्तिक सर्वोत्तम 89.94 मीटरपेक्षा कमी होते, तर स्मिट त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम 83.29 मीटरच्या जवळ पोहोचला. या दोनच खेळाडूंनी स्पर्धेत 80 मीटरचा टप्पा पार केला. द. आफ्रिकेचे आणखी एक भालाफेकपटू डंकन रॉबर्टसन याने 71.22 मीटरच्या प्रयत्नासह तिसरे स्थान मिळवले. निरज सध्या आपल्या नवीन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली पोटचेफस्टूममध्ये सराव करत आहे. त्याने 16 मे रोजी होणाऱ्या दोहा डायमंड लीगसाठी कंबर कसली आहे. तसेच मे महिन्यात भारतात होणाऱ्या वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर भालाफेक स्पर्धेतही भाग घेईल.