अणसूरपाल हायस्कूलला फिट इंडिया मानांकन.

अणसूरपाल हायस्कूलला फिट इंडिया मानांकन.

वेंगुर्ला.

    क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार व फिट इंडिया यांच्यावतीने अणसूर पाल हायस्कूल अणसूर शाळेला फिट इंडिया मानांकनाचे सन्मानपत्र व फिट इंडिया फ्लॅग प्राप्त झाले. राष्ट्रीय क्रीडादिनी एकता विष्णोई मिशन डायरेक्टर फिट इंडिया व सिद्धार्थ सिंग जाॅइंट सेक्रेटरी क्रीडा विकास भारत सरकार यांच्या स्वाक्षरीने हे मानांकन देण्यात आले. तसेच, राष्ट्रीय क्रीडा सप्ताहानिमित्त आयोजित विविध क्रीडा विषयक उपक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल खेलो इंडिया व फिट इंडिया यांच्यावतीने अणसूर पाल हायस्कूलला ॲप्रिसिएशन सन्मानपत्र प्राप्त झाले. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांचे मार्गदर्शन लाभले.
   हाॅकिचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून भारतभर उत्साहात साजरा केला जातो. याचे औचित्य साधून, शाळेच्या दर्शनी भागात मेजर ध्यानचंद यांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले व विद्यार्थी खेळाडूंनी फिट इंडिया फ्लॅग उंचावून क्रीडा शपथ घेतली. तसेच, शाळेतील विद्यार्थीनी कॅरमपटूू  पुर्वा विनोद चव्हाण व बुद्धीबळपटू औदुंबर अर्जुन परब यांनी तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होवून नैपुण्य प्राप्त केल्याबद्दल शालेय समिती चेअरमन एम. जी.मातोंडकर, सदस्य दिपक गावडे, दत्ताराम गावडे व देवु गावडे यांच्या शुभहस्ते  फिट इंडिया ॲप्रिसिएशन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षक विजय ठाकर, अक्षता पेडणेकर, चारुता परब ,सुधीर पालकर व शिक्षकेतर कर्मचारी  आदी उपस्थित होते. शाळा व  विद्यार्थी खेळाडूंचे अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे, सेक्रेटरी लिलाधर गावडे, खजिनदार बाळकृष्ण तावडे व मान्यवरांनी अभिनंदन केले.