दिघी येथे २७ हजार कोटींच्या जहाजबांधणी समूहासाठी करार
मुंबई, दि. १५
रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहामध्ये प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांच्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.या करारामुळे राज्यात १५ हजार थेट आणि ७५ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. माझगाव डॉककडून दिघी येथे प्रतिवर्ष किमान २ दशलक्ष सकल टनभार जहाजबांधणी क्षमतेसाठी सुमारे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या ‘मेरीटाईम अमृत काल व्हिजन २०४७’च्या उद्दिष्टांना पूरक ठरणार आहे.याप्रसंगी बंदरे व परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते. एमडीएलतर्फे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन तर एनशिपएमएलतर्फे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पी. यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
konkansamwad 
