मदर तेरेसा स्कूल वेंगुर्लेचा सलग १५व्या वर्षी १०० टक्के निकाल.....नुपूर गावडे ९८ टक्क्यांसह तालुक्यात प्रथम
वेंगुर्ले
वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलने एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत सलग 15 वर्षे 100 टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे. यंदाही शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले.यावर्षी परीक्षेला बसलेले सर्वच्या सर्व 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी 32 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, 15 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर 6 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली.
शाळेतील पहिले पाच क्रमांक
1. कु. नुपूर विलास गावडे: 98.00 टक्के
2. कु. कस्तुरी दिनेश तुळसकर: 97.80 टक्के
3. कु. ऋषिका अतुल नेरुळकर: 95.40 टक्के
4. कु. इशिता मार्यान फर्नांडिस: 94.60 टक्के
5. कु. कश्मिरा महेश परब: 91.60 टक्के
या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
konkansamwad 
