१ एप्रिलपासून ‘या’ मोबाईल नंबरच्या बँकिंग आणि UPI सेवा होणार बंद

मुंबई
1 एप्रिलपासून बँक गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारख्या यूपीआय ॲप्ससोबत जोडलेल्या काही वापरकर्त्यांची खाती बंद करीत आहेत. ज्या लोकांचे मोबाईल नंबर बऱ्याच काळापासून निष्क्रिय आहे, अशा वापरकर्त्यांची खाती बंद होणार आहेत.नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने बँकांना आणि या अॅप्सना 31 मार्चपर्यंत असे नंबर काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. हा बदल निष्क्रिय किंवा पुनर्वापरित मोबाईल नंबरमुळे उद्भवणाऱ्या समस्यांना (UPI) तोंड देण्यासाठी आहे.निष्क्रिय किंवा पुनर्वापर केलेले मोबाइल नंबर व्यवहारांमध्ये समस्या निर्माण करतात, त्यामुळे बँका हा निर्णय घेत आहेत.जर एखादा नंबर 90 दिवसांपर्यंत व्हॉइस कॉल, एसएमएस किंवा डेटासाठी वापरला गेला नाही तर तो नंबर निष्क्रिय होतो. असे क्रमांक पुन्हा नवीन वापरकर्त्यांना दिले जातात.अशा परिस्थितीत,जेव्हा हे क्रमांक तुमच्या बँक आणि इतर वित्तीय सेवांशी जोडलेले असतात, तेव्हा त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.1 एप्रिलनंतर, अशी बँक खाती दर आठवड्याला हटवली जातील. कोणत्याही पेमेंटसाठी मोबाईल नंबर आवश्यक असेल. तुमच्या नंबरमध्ये काही समस्या असल्यास, व्यवहार अयशस्वी होऊ शकतो. बरेच वापरकर्ते त्यांच्या बँक खात्यांना किंवा UPI ॲप्सना अनेक नंबर लिंक करतात. जर यापैकी कोणताही नंबर जास्त काळ निष्क्रिय राहिला, तर तो हटवला जाईल.व्यवहाराशी संबंधित समस्या टाळण्यासाठी, NPCI ने बँका आणि UPI ॲप्सना दर आठवड्याला हटवलेल्या नंबरची यादी अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत.1 एप्रिलनंतर कोणतेही निष्क्रिय किंवा पुनर्वापर केलेले क्रमांक बँकेच्या सिस्टममधून तात्काळ काढून टाकले जातील. जर तुम्हाला तुमचे बँक खाते किंवा UPI आयडी सक्रिय ठेवायचे असेल, तर आपल्या मोबाईल क्रमांकावर रिचार्ज करण्याचा एकच पर्याय आहे.