टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड चॅम्पियन....न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत सूर्यासेनेची ऐतिहासिक कामगिरी

टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड चॅम्पियन....न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत सूर्यासेनेची ऐतिहासिक कामगिरी

अहमदाबाद
 

   टीम इंडियाने न्यूझीलंडवर सांघिक कामगिराच्या जोरावर दणदणीत विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आणि सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे.टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीडंवर 96 धावांच्या एकतर्फी फरकाने मात करत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीवर आपल नाव कोरल आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 256 धावांच विक्रमी आव्हान ठेवल होत. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आले नाही. टीम इंडियाने न्यूझीलंडला 19 ओव्हरमध्ये 159 रन्सवर गुंडाळल. भारताने यासह सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिल्याच झटक्यात टी 20 वर्ल्ड कप जिंकला. तसेच भारताची ही टी 20 वर्ल्ड कप चॅम्पियन होण्याची सलग दुसरी तर एकूण तिसरी वेळ ठरली. भारताने 2024 साली रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेवर मात करत 17 वर्षांनंतर पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्याआधी महेंद्रसिंह धोनी याने भारताला 2007 साली पहिल्याच झटक्यात ही ट्रॉफी जिंकून दिली होती.टीम इंडियाचा 2024 पासून टी 20 वर्ल्ड कपमधील 16 वा विजय भारताचा हा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 2024 पासूनचा 17 वा सामना होता. भारताने न्यूझीलंडला पराभूत करत 2024 पासून 16 वा विजय मिळवला. तर भारताने एकमेव सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर 8 फेरीत नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गमावला.