खास. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..
वेंगुर्ले
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस वेंगुर्ले सह संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. वेंगुर्ले तालुक्यात या व्हॉलीबॉल स्पर्धेसह, दशावतारी नाट्य महोत्सव, कबड्डी स्पर्धा, आरोग्य शिबिर असे विविध कार्यक्रम सुरू आहेत. राणे साहेबांचे आम्ही कार्यकर्ते असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या आंतरराज्य हॉलीबॉल स्पर्धेतून राज्यस्तरीय खेळाडू निर्माण होतील असा विश्वास जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ वेंगुर्ले येथे बोलताना व्यक्त केला. वेंगुर्ले येथे “संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६” अंतर्गत भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा आणि जय मानसीश्वर संघ यांच्यावतीने भव्य खुली आंतरराज्य पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा प्रदेश सदस्य श्री. शरद चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती श्री प्रितेश राऊळ बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा स्पर्धा संयोजक श्री प्रसन्ना (बाळू) देसाई, भाजपा वेंगुर्ला मंडळ अध्यक्ष श्री. विष्णू उर्फ पप्पू परब, भाजपा प्रदेश सदस्य श्री. शरद चव्हाण, भाजपा तालुका सरचिटणीस श्री. वसंत तांडेल, नगराध्यक्ष श्री. राजन गिरप, नगरसेविका आकांक्षा परब, शितल आंगचेकर, रिया केरकर, गौरी माईणकर, नगरसेवक यशवंत उर्फ दाजी परब, सचिन शेटये, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. धनराज गोस्वामी, प्राध्यापक श्री जे. वाय. नाईक, प्राध्यापक श्री. बी. जी. गायकवाड, मच्छिमार सेलचे अनंत (दादा) केळूसकर, भाजपाचे जयंत मोंडकर, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. प्रणव वायंगणकर, भूषण आंगचेकर, युवा मोर्चाचे मनोहर तांडेल, कौस्तुभ वायंगणकर, सॅमसंग फर्नांडिस, तुषार साळगांवकर, भूषण सारंग, हेमंत तुळसकर, संदीप शेटये, नामदेव सरमळकर, पंच हेमंत गावडे, राधाकृष्ण उर्फ दादा पेडणेकर, अमित हर्डीकर, संदीप शेटये आदी उपस्थित होते.दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गसह रत्नागिरी गोवा या भागातील संघ सहभागी झाले आहेत. दरम्यान यावेळी मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष राजन गिरप यांनी वेंगुर्लेमध्ये अनेक वर्षापासून हॉलीबॉल खेळ खेळला जातो. या खेळाची स्पर्धा होत असल्याचे पाहून समाधान वाटले. वेंगुर्लेमध्ये कुठची ही स्पर्धा असो, स्पर्धेचे नियोजन सुंदर असते. बाळू देसाई यांच्याकडे तर नियोजन असेल तर ते अचूक होणारच असेहि त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य गोस्वामी यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वसंत तांडेल यांनी तर स्वागत प्रणव वायंगणकर व आभार बाळू देसाई यांनी मानले. स्पर्धेचे नियोजन युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी यांनी केले.
konkansamwad 
