बांद्यात भरधाव कारच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

बांद्यात भरधाव कारच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

बांदा 

 

   रस्त्याच्या  बाजूला दुचाकी लावून उभ्या असलेल्या युवकाला भरधाव कारने धडक दिल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. ही घटना आज सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर सटमटवाडी तपासणी नाक्याजवळ घडली. आदेश शेखर पेडणेकर (वय २८) असे त्या युवकाचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आल्याचे समजते.आदेश महामार्गाच्या कडेला आपल्या दुचाकीवर बसलेला असताना, अचानक समोरून आलेल्या एका भरधाव कारने त्याला जोराची धडक दिली. या अपघातात आदेशला मोठी दुखापत झाली असून घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत त्याला बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारांसाठी गोव्यातील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातामुळे बांदा परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.