आमदार निलेश राणे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती जाहीर
मालवण
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, आमदार निलेश राणे यांची मालवण नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांच्याकडे मालवण आणि कणकवली या दोन महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे आगामी निवडणुकीतील शिवसेनेच्या तयारीला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.

konkansamwad 
